महाराष्ट्रातील कोविड निर्बंध शिथिल करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्वाची माहिती, म्हणाले…
महाराष्ट्रातील कोविड निर्बंध शिथिल करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्वाची माहिती, म्हणाले…
मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी अशा विविध मुद्द्यांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत. विमानतळावर निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवानगी नसायची, त्यांना आयसोलेट केलं जायचं. आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत आहोत. कदाचीत रेल्वेजवळ तेवढं मनुष्यबळ नसेल. तसेच येवढ्या गर्दीत प्रवाशांची तपासनी होईल का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अद्याप लोकलबाबत निर्णय झालेला नसेल. पण दोन लस घेतल्या असतील तर अनेक निर्बंध शिथिल करायला हवेत. या विचारांच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स योग्य निर्णय घेतील, असा मला आशावाद आहे, असं राजेश टोपे म्हणाले. ते म्हणाले की, तिसरी लाट येऊ शकते. ही लाट कधी येणार हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे. आपण निर्बंध पाळले, लसीकरण केलं तर ही लाट आपण थोपवू शकतो. आपण लसीकरण जोरात केलं तर लाट रोखू शकतो, असं राजेश टोपे म्हणाले. राजेश टोपे म्हणाले की, आपण राज्यात एक्सपर्टशी बोलूनच निर्णय घेतो. ICMR ने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. ICMR ने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल द्यावा. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल, या संदर्भात सुचना द्याव्यात. कारण आताच केंद्राची टिम येऊन गेली त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियम पाळत आहोत. ICMR ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल. सेरो सर्व्हेनुसार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात अॅन्टिबॉडिज विकसित झाल्या आहेत. ही चांगली बाब आहे, असं टोपे म्हणाले. टोपे म्हणाले की, आमची अपेक्षा आहे की, महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. आम्ही रोज जशी लस येईल तसं अडीच-तीन लाख लसीकरण करतोय. लस जास्त प्रमाणात मिळाली तर हे प्रमाण वाढेल. जर 70 ते 80 टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची असल्याचे टोपे म्हणाले.
....................................
२ लाख हून अधिक वाचक५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment