अर्जुना धरणा लगतच्या भिंतीजवळून होतेय मातीची धूप, स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण

 





अर्जुना धरणा लगतच्या भिंतीजवळून होतेय मातीची धूप, स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण




राजापूर:-तालुक्यातील पुर्व भागातील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या उचव्या कालव्याच्या लगत मातीची धूप होऊ लागल्याने या परिसरातीरल ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे धरणाला धोका निर्माण होण्याची भितीही व्यक्त होत आहे. त्यामुळे संबधीत यंत्रणेने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी पुढे आली आहे.राजापूर तालुक्यातील पुर्व भागातील अर्जुना मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील सर्वात मोठा धरण प्रकल्प आहे. सध्या हे धरण पुर्णपणे भरून वाहू लागले आहे. त्यामुळे अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहातही वाढ झाली आहे.दरम्यान गेले काही दिवस धरण परिसरात मुसळधार पडलेल्या पावसामुळे अर्जुनाच्या उजव्या कालव्याच्या लगतची माती ढासळू लागली आहे. त्यामुळे सातत्याने ढासळणाऱ्या या मातीमुळे धरणाला तर धोका नाही ना अशी शंका स्थानिक जनतेतुन उपस्थित केली जात आहे. गेल्या काही दिवसात संततधार झालेल्या पावसामुळे या ठिकाणी माती घळण्याचे प्रमाण वाढले असून तेथून पाण्याचा प्रवाह वेगाने वहात आहे. त्यामुळे काहीसे भितीचे वातावरण आहे.याबाबत संबधीत विभागाने तातडीने लक्ष घालुन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.


..................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!

बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Comments