संगमेश्वर : कोंडअसुर्डे येथील श्रीराम मंदिरात दागिने, रोख रक्कमेची चोरी




 संगमेश्वर : कोंडअसुर्डे येथील श्रीराम मंदिरात दागिने, रोख रक्कमेची चोरी


देवरूख:-संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथील श्रीराम मंदिर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदी व पितळेचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४८ हजार ३०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत मंदिराचे पुजारी अनिल ढोल्ये यांनी फिर्याद दिली आहे. कोंडअसुडर्डे येथील श्रीराम मंदिराचे साईडचे दरवाजाचे कुलुप व मंदिराचे आतील लोखंडी कपाट व त्यातील लॉकर चोरट्यांनी फोडून सोन्याचे व चांदीचे व पितळेचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४८ हजार ३०० रूपयांचाा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.हा प्रकार गुरूवारी दुपारी १२ ते शुक्रवार दुपारी ११.३० या कालावधीत घडला आहे. नेहमीप्रमाणे पुजारी शुक्रवारी सकाळी पुजेसाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आली.त्यांनी हा प्रकार ग्रामस्थांच्या कानावर घातला. यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात चोरीबाबत फीर्याद दाखल करण्यात आली. दिलेल्या फीर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबबत अधिक तपास पोलीस करत आहेत 


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments