सुखद धक्का!; बारामतीतील गावात वीज कोसळताच कोरडे माळरान जलमय!
सुखद धक्का!; बारामतीतील गावात वीज कोसळताच कोरडे माळरान जलमय!
बारामती:नैसर्गिक आपत्ती प्रत्येक वेळी हानिकारक ठरतेच असे नाही. कधी कधी ही आपत्ती आशेचा किरण दाखवणारीही ठरते. याचा अनुभव बारामती तालुक्यातील कारखेल गावाला आला आहे. गावच्या माळरानावर शुक्रवारी वीज कोसळली आणि तिथेच पाण्याचे झरे वाहू लागले. खडकाळ भाग काही वेळातच जलमय झाला. ही घटना गावकऱ्यांना सुखद धक्का देणारी ठरली. बारामती तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागते. येथील सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलीमिटरच्या दरम्यान असते. बारामती तालुक्यातील २२ गावे जिरायती पट्ट्यामध्ये मोडतात. यामध्ये कारखेल या गावाचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून कारखेल परिसरात तुरळक पाऊस सुरू होता. त्यात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान, ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या परिसरात वीज कोसळली. माळरानावर ज्या ठिकाणी ही वीज कोसळली त्याठिकाणि जमिनीतून पाण्याचे झरे वाहू लागले आहेत.
गावातील मेंढपाळ आणि शेतकऱ्यांना माळरानावर अचानक जमिनीतून पाणी वाहताना दिसले आणि सगळेच अवाक् झाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे. ही घटना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत राजहंस भापकर या गावकऱ्याने प्रतिक्रिया दिली. आमच्या गावात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असते. उन्हाळ्यामध्ये जनावरांसह माणसांचे देखील पाण्यामुळे हाल होतात. वीज पडल्याने आमच्या दुष्काळी गावात गंगा अवतरली आहे, असे भापकर म्हणाले.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment