अणुस्कुरा घाटमार्गे एसटीची वाहतूक सुरू; आंबा घाट बंदच







  अणुस्कुरा घाटमार्गे एसटीची वाहतूक सुरू; आंबा घाट बंदच


रत्नागिरी : अणुस्कुरा घाटमार्गे एसटीने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरला एसटीने जाणे शक्य होणार आहे. आंबा घाट बंद असल्यामुळे रत्नागिरी व राजापूरमधील प्रवाशांकरिता रत्नागिरी व राजापूर एसटी आगारांनी दोन फेऱ्या सुरू केल्या आहेत. गुरुवारपासून या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर आंबा घाट येथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे तसेच मार्ग खचल्याने आंबा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे रत्नागिरी व राजापूरमधून कोल्हापूरमध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी एसटी आगाराने दोन नवीन फेऱ्या सुरू केल्या आहेत. रत्नागिरी, पाली, लांजा, पाचल, अणुस्कुरा, कोल्हापूर आणि राजापूर, पाचल, अणुस्कुरा, कोल्हापूर अशा या फेऱ्या आहेत.




--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments