ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पेट्रोल देण्याची मागणी
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पेट्रोल देण्याची मागणी
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरीला जोडणारा आंबाघाट हा दरड कोसळल्याने व खचल्याने आठवडाभर बंद आहे. त्याचा परिणाम तालुक्यातील पेट्रोल व डिझेल पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे पेट्रोलपंपामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही पेट्रोल नाकारले जात आहे. त्यांना गावपातळीवर काम करण्यास व पाणीपुरवठा करण्यास अडचण येत आहे. तरी पुरवठा विभागाने ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वाहनात पेट्रोल पुरवठा करण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत ही महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था असून त्यामार्फत अनेक शासकीय कामे केली जातात. त्यामध्ये सध्या कोरोना प्रादुर्भाव उपाययोजना करणे, लसीकरण नियोजन, अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान, गावातील पाणीपुरवठा व अन्य शासकीय कामेही ग्रामपंचायत लिपिक, शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी यांच्यामार्फत केली जातात. शासनाच्या आदेशानुसार पेट्रोल पंपावर तहसीलदारांचे पत्र असल्याशिवाय अन्य कोणालाही पेट्रोल दिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे शासनाने व पुरवठा विभागाने किमान ग्रामीण भागात तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून त्यांची नोंद घेऊन त्यांच्या वाहनांकरिता पेट्रोल पुरवठा करण्याची मागणी ग्रा.पं. कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा