इचलकरंजी शहरामध्ये उडाली एकच खळबळ
इचलकरंजी शहरामध्ये उडाली एकच खळबळ
इचलकरंजी:-इचलकरंजी शहरात रूग्ण वाढीचा आलेख अद्यापही कायम आहे. रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार शहरात रविवारी सुमारे ६० रूग्ण आढळून आले असून जवाहरनगरमध्ये ९ तर शहापूरमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शहरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या कमी होणे अपेक्षित आहे. मात्र दररोज रूग्ण संख्येत (corona cases updates) भर पडत चालली असल्याचे दिसते. रविवारी पुन्हा बाधीतांच्या संख्येने उसळी घेतल्याचे दिसून आलेविविध ३५ भागातील ६० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. आज प्राप्त अहवालात जवाहरनगर ९, शहापूर ७, गणेशनगर ४, हुलगेश्वरी रोड, मंगलमुर्ती चित्रमंदिरजवळ ३, टाकवडेवेस, आमराई रोड, गुरुकन्नननगर, इंडस्ट्रियल इस्टेट, बालाजीनगर येथील प्रत्येकी २, सातपुते गल्ली, साखर हॉस्पिटल जवळ, बंडगर माळ, शाहु पुतळा, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, भोने माळ, विकासनगर, बालाजीनगर, सर्वोदयनगर,मुक्त सैनिक सोसायटी, वर्धमान चौक, आरगे मळा, महासत्ता चौक, सांगली रोड, स्टेशन रोड, बिग बझार, सहकारनगर, इंदिरानगर, मथुरानगर, शांतीनगर, बोहरा मार्केट, मंगळवार पेठ, सुतार मळा, गुजरी पेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आत्तापर्यंत बाधीतांची संख्या ८ हजार ५२९ वर पोहचली असून बाधीत मृतांची संख्या ३८२ वर स्थिर आहे. सध्या ४०८ अॅक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment