भाजपच्या वतीने तीन हजार कुटुंबांना १५ दिवसांचे जिन्नस वितरण






भाजपच्या वतीने तीन हजार कुटुंबांना १५ दिवसांचे जिन्नस वितरण



उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचा पुढाकार


रत्नागिरी:- चिपळुणमध्ये न भुतो न भविष्यता असा महापूर आला आणि प्रचंड प्रमाणात हानी झाली. गरिबांपासून उच्चभ्रू व्यक्तींनाही आणि कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तींना या पुराने सोडले नाही. शेकडो घरे पाण्याखाली गेली, अनेकांचे संसार उदध्वस्त झाले. राजकारण न करता समाजकारणात सक्रिय असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले आहे. भाजपने गेल्या चार दिवसांत पूरग्रस्त तीन हजार कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा जिन्नस, वाणसामान दिले आहे. अजूनही मदत करण्यात येणार आहे. भाजपने चिपळुणातील वीरेश्वर तलावानजीकच्या ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये संकलन केंद्र सुरू केले. येथूनच नियोजनबद्धरित्या मदत पोहोचवली जात आहे. त्यामुळे कोणत्या भागांत कसली मदत हवी आहे, याचा आढावा घेऊन त्या प्रकारचे साहित्य, जिन्नस, शिधा पॅकिंग करून तो वेळेवर पोहोचवण्यात येत आहे. कार्यकर्ते मदत देण्याकरिता अहोरात्र मेहनत घेत आहेत. भाजपतर्फे पूरग्रस्तांना तांदूळ, आटा, डाळी, तेल, मीठ, मसाला, डाळी यांसह घरात स्वच्छतेसाठी लागणारे फिनेल, डेटॉल आणि कपडे, भांड्यांचे साबण अशा विविध वस्तू दिल्या आहेत. हा पंधरा दिवसांचा शिधा व साहित्य असून अजूनही मोठ्या प्रमाणात चिपळूण पुरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून भरपूर प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. 
उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, भारतीय जनता युवा मोर्चा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन आणि संतोष मालप यांच्या मार्गदर्शन, सहकार्यातून कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.



--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या