खेडमध्ये घरफोडी; साडेतीन लाखांची रोकड लंपास



 खेडमध्ये घरफोडी; साडेतीन लाखांची रोकड लंपास


 खेड : तालुक्यातील वेरूळ रेल्वे स्थानकाजवळील बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील ३ लाख ५० हजार रुपयांची रोकडसह दहा हजार रुपये किमतीचा एल.सी.डी टीव्ही अज्ञात चोरट्याने लांबविल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत गजानन गोविंद कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते घर बंद करून पुरे बुद्रुक येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दर्शनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोकड सह टीव्ही लंपास केला ही घटना ता. १० जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते ता. ११ जुलै रोजी सकाळी ११.३० या वेळेस घडल्याची तक्रारीत नमूद केले आहे. त्या नुसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.





....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org