कोंडगाव येथे उद्या रक्तदान शिबिर
कोंडगाव येथे उद्या रक्तदान शिबिर
देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रक्ताची कमतरता भासत आहे, कोरोनाचा सध्या कठीण काळ सुरू आहे. यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे रक्तदान शिबिराचे दि. १७ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कबनूरकर हॉल येथे होणार आहे. डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच्या वतीने हे रक्तदान शिबिर घेण्याचे निश्चित केले. याला कोंडगाव येथील व्यापारी मंडळाने देखील प्रतिसाद देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यानुसार शिबिर होणार आहे. कोंडगाव येथील व्यापारी मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून सर्वांनी या शिबिरास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराच्या अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी वैभव भोसले, स्वरूप जोगळेकर, दत्तू शेट्ये, संजय शेडगे यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment