श्रीराम मंदिर बस पिक अप शेड दुरूस्ती








 __प्रसिद्धी पत्रक___


श्रीराम मंदिर बस पिक अप शेड दुरूस्ती


कोकणात तोक्ते चक्रिवादळाचे आगमन झाले आणि दि.16/05/2021 रोजी देवरूखातील राममंदिर बस स्टॉप येथील पिकअप शेड वर मोठे झाड कोसळून शेड वाकून क्षतिग्रस्त झाली.


_शेडचा इतिहास_

सदर शेड देवरूखातील प्रतिष्ठित व्यापारी, सुरेश क्लाॅथ सेंटर आणि महाराणा प्रताप हवेली चे मालक ठाकुर साहेब प्रेमसिंहजी हरिसिंहजी चुंडावत यांनी 100% स्वखर्चाने 20/02/2017 रोजी बांधून लोकांच्या सेवेसाठी सज्ज करून दिली.प्रेमसिंहजींचे चिरंजीव भगवतसिंह चुंडावत तत्कालीन लायन्स क्लब ऑफ देवरूखचे अध्यक्ष असल्याने,एक आठवण म्हणून लायन्स क्लबचे देखील नाव प्रेमाने  लावण्यात आले.मागिल 4-5 वर्षे त्या शेडची निगा चुंडावत कुटुंबियांकडून राखली जात आहे. जसे की कलर करणे,दर महिन्याला साफसफाई करणे, कडप्पा दुरूस्त करणे इ.आज तागायत चालू आहे आणि येणार्या काळात सुद्धा अविरत चालू राहील. साफसफाईत नगरपंचायत चे देखिल मोलाचे सहकार्य लाभते.


_शेड दुरूस्तीस विलंबाचे कारण_

▪️ज्या दिवशी शेड क्षतिग्रस्त झाली, त्याच दिवशी, त्याच ठिकाणी दुरूस्तीचे कंत्राट देवरूखातील श्री.जयंतशेठ राजवाडे यांना आमच्या कडून देण्यात आले होते. 

▪️याच दरम्यान सततचे लोकडाऊन मुळे  कामगार वर्ग वेळेवर न मिळणे, लाईट उपलब्ध न होणे, मटेरियल शोर्टेज, शासकीय नियमांचे पालन करणे इ. बाबींमुळे नाईलाजास्तव एक-एक दिवस पुढे सरकत होता. तो 45 दिवस विलंब झाला. 

(यागोष्टी कंत्राटदारांचे अथवा आमच्या हातात नव्हत्या)


👉 शेडची बांधणी मजबूत असल्याने या 45 दिवसांत क्षतिग्रस्त होऊन देखील शेड आपली सेवा बजावत होती.(सोबत फोटो पहावे)


👍🏻 अखेर 08/07/2021 रोजी शेड दुरूस्तीचे काम कंत्राटदारांनी हाथी घेऊन 09/07/2021 रोजी भर पावसात सुद्धा पूर्णत्वास नेले.दुरूस्तीचा खर्च देखिल प्रेमसिंहजी चुंडावत यांनी केला.


🛑 यादरम्याने काही समाजसेवी संस्थांकडून आणि प्रसिद्धी माध्यमातून(Newspaper,WhatsApp, facebook,etc.) सदर नादुरुस्त शेड चा विषय योगायोगाने  वायरल झालेला होता.

वास्तविक सदर दुरूस्तीचा विषय हा पाईपलाईन मध्ये होता आणि तो 100% पूर्ण होणारच होता.

कोणत्याही बातमीमुळे सदर शेड दुरूस्त झाली असा अर्थ लागत नाही. 


🙏🏻 तरी देखील लोकसेवेच्या या विषयाबद्दल लोकांच्या मनात जागरूकता आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या विषयावर लक्ष वेधले,त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


कुंवरसाहेब भगवतसिंह प्रेमसिंह चुंडावत.

▪️भाजपा युवा नेता.

▪️भाजपा संगमेश्वर तालुका रुग्णवाहिका सेवा समन्वयक. 

▪️माजी अध्यक्ष,लायन्स क्लब देवरूख(2016-17)

▪️नाम फाऊंडेशन,संगमेश्वर समन्वयक.

▪️कार्याध्यक्ष, क्षत्रिय राजपूत समाज,कोकण विभाग


महाराणा प्रताप हवेली.

देवरूख.रत्नागिरी.

मो.9422432212.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments