बनवाबनवी टोळी गजाआड



 रत्नागिरीमधील एक रिक्षा व्यावसायिक फैयाज दिलावर शेख वय ४० रा. शिरगाव हे रत्नागिरीमध्ये गेली ११ वर्षे रिक्षा व्यवसाय करतात. त्यांच्या स्वत:च्या मालकीची MH08E-6576 या क्रमांकाची रिक्षा आहे. हि रिक्षा रत्नागिरी आरटीओ ऑफिसला पासिंगसाठी नेली असता ती ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याचे त्यांना समजले. अधिक माहिती घेतली असता कोल्हापूर आरटीओकडून हि कारवाई करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. परंतु, शेख यांनी सांगितले कि, जी रिक्षा कधी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर गेलेलीच नाही, तिच्यावर कोल्हापुरमध्ये कारवाई होऊच कशी शकते? या सर्व प्रकरणामध्ये काहीतरी काळबेर असल्याचे त्यांच्या लक्षात आले, ते या प्रकारणाच्या शोध घेण्यासाठी कोल्हापूरला गेले. परंतु, तिथे सुद्धा त्यांना काहीच समाधानकारक माहिती मिळाली नाही.


Comments