खेडमध्ये कोरोनासोबत डेंग्यूचे संकट

 


खेडमध्ये कोरोनासोबत डेंग्यूचे संकट


खेड : कोरोनाचे संकट डोक्यावर असताना खेडमध्ये डेंग्यू सदृश्य रोगाने डोकं वर काढलं आहे. गेले काही दिवस खेडमध्ये डेंग्यूसदृश्य रोगाची लक्षणं असलेले अनेक रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासन हबकून गेले असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. डेंग्युपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन खेड नगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ठिकठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घराशेजारी पाण्याचे डबके साचू देवू नये, पाणी उकळून प्यावे, तापाची लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सुचना नगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.  



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या