रत्नागिरीतील विक्रम जोशीला देशपातळीवरील यंग सायंटिस्ट अवॉर्ड प्राप्त
रत्नागिरीतील विक्रम जोशीला देशपातळीवरील यंग सायंटिस्ट अवॉर्ड प्राप्त
फार्मासि क्षेत्रातील परीक्षेत भारतातून प्रथम क्रमांक
रत्नागिरी : देशपातळीवरील नॅशनल इन्सि्टट्युट ऑफ फार्मासिटीकल अँड रिसर्च सेंटर मोहाली, पंजाब व डीआरपीआय यांनी आयोजित केलेल्या यंग सायंटिस्ट अवॉर्ड २०२१ या स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील विक्रम चंद्रशेखर जोशी याने या एम.फार्म पातळीवरील स्पर्धेमध्ये संपुर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोसायटी फॉर फार्मासिटीकल डिजोलेशन सायन्स यांच्यामार्फत हि परीक्षा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने पार पडली. विक्रमच्या या यशाने रत्नागिरीचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर झळकले आहे. फार्मासिटीकल डिजोलेशन सायन्स व अमेरिकन असोसिएशन ऑफ फार्मासिटीकल सायन्स व असोसिएशन ऑफ फार्मासिटीकल टिचर्स ऑफ इंडिया यांनी डिआरपीआय २०२१ ची फार्मासि विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हि परीक्षा घेतली होती. यामध्ये देश पातळीवरील या क्षेत्रातील १०० गुण अधिक संस्थांनी व २२६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. फार्मासि क्षेत्रातील पीएचडी, एम.फार्म त्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ञ डॉ. सरंजित सिंग, डॉ. माला मेनन, डॉ. विनोद शाहा, डॉ. उमेश बाणाकर, डॉ. जे.मेशेल वùŠरेट, डॉ. पद्मा देवराजन, डॉ. मंगल नगरसेनकर, डॉ. मेथिअस वाùकर, डॉ. बेला प्रभाकर, डॉ. सेंड्रा सुरेज, डॉ. कृष्णप्रिया मोहनराज, डॉ. वर्षा प्रधान, डॉ. पिंटु कुमारडे, डॉ. अंबर व्यास, डॉ. सुजाता सावरकर, डॉ. हेमा नायर यांच्या कमिटीने परीक्षण केले. या परीक्षेची उपांत्य फेरी १० व ११ जुलै २०२१ रोजी तर अखिल भारतीय अंतिम फेरी १७ जुलै रोजी पार पडली. यामधील विक्रमने देशपातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केला. विक्रम हा रत्नागिरीमधील जोशी मेडीकलचे डॉ. चंद्रशेखर जोशी यांचा मुलगा आहे. या देशपातळीवरील यंग सायंटिस्ट पुरस्काराचे स्वरुप रु. ५०,०००/- व प्रशस्तीपत्रक असे आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दलही विक्रमला गौरवण्यात आले आहे. विक्रमच्या या यशाबद्दल रत्नागिरीतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment