सोन्यामध्ये पडझड सुरूच ; नफवसुलीने कमॉडिटी बाजारात सोने चांदीमधील तेजी ओसरली
सोन्यामध्ये पडझड सुरूच ; नफवसुलीने कमॉडिटी बाजारात सोने चांदीमधील तेजी ओसरली
मुंबई : नफावसुलीने सोने आणि चांदीला मोठा फटका बसला आहे. जागतिक बाजारातील अनिश्चिततेचे पडसाद कमॉडिटी बाजारात उमटत आहेत. सोन्याचा भाव पुन्हा एकदा ४७००० खाली घसरला आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतीत २२५ रुपयांची घसरण झाली. चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाली. आज बुधवारी बकरी ईद निमित्त कमाॅडिटी बाजार बंद आहे. एमसीएक्सवर मंगळवारी सोने आणि चांदीमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली. सोन्याचा भाव ४७८६९ रुपयांवर स्थिरावला. त्यात २२५ रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी सोने ४७७७१ रुपयापर्यंत खाली घसरले होते.चांदीला देखील नफावसुलीचा फटका बसला आहे. काल चांदीमध्ये ६४९ रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६६५९७ रुपयांवर स्थिरावला. तो ६६२८६ रुपयांपर्यंत खाली आला होता.Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३१० इतका खाली आला आहे तर २४ कॅरेटचा भाव ४८३१० रुपये इतका आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७४१० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१७२० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५३०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४२० रुपये आहे. त्यात ३९० रुपयांची घसरण झाली आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०२१० रुपये आहे.
...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment