शीळ येथे घरावर झाड पडून नुकसान
शीळ येथे घरावर झाड पडून नुकसान
राजापूर : जोरदार पावसामुळे शहरानजीकच्या शीळ येथील जयकुमार बिर्जे आणि विश्वास बिर्जे यांच्या घरावर रविवारी रात्री एकच्या सुमारास आंब्याचे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने घरातील लहान मुलांना कोणतीही इजा झाली नाही. घराच्या ज्या ठिकाणी झाड पडले त्या खोलीमध्ये विश्वास बिर्जे, त्यांची पत्नी आणि दोन मुले झोपलेली होती. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले पती-पत्नी तत्काळ जागे होऊन त्यांनी खोलीतील लाईट सुरू केला. खोलीमध्ये छप्परावरील तुटलले पत्रे पाहून स्वतः जखमी झालेल्या स्थितीमध्ये छोट्या मुलांना घेऊन खोलीतून बाहेर पडले. या घटनेमध्ये सुदैवाने झोपलेल्या लहान मुलांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, विश्वास आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. दरम्यान, ही माहिती शीळचे उपसरपंच अशोक पेडणेकर आणि सहकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ किरकोळ जखमी झालेल्या विश्वास बिर्जे पत्नी-पत्नीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे उपसरपंच पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी सकाळी पडवीच्या छप्परावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करून पडवी मोकळी करण्याचे काम सुरू होते. सरपंच नामदेव गोंडाळ, तलाठी कोकरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी आणि पंचनामा केला. आंब्याचे झाड पडून नुकसान झालेली पड़वी सुस्थितीमध्ये होईपर्यंत बाजूच्या घरामध्ये बिर्जे कुटुंबीयांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती उपसरपंच पेडणेकर यांनी दिली.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment