महाराष्ट्रात होणार आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा
महाराष्ट्रात होणार आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा
आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा एएफसी महिला आशिया कप २०२२ स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात येणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत या संदर्भात माहिती दिली.राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम सर्व मापदंडांवर सुसंगत आहेत. राज्यात स्पर्धेसाठी आणि सरावासाठी अद्ययावत खेळपट्टी उपलब्ध असल्याचेही केदार यांनी सांगितले.त्याचबरोबर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले कि, फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी २०२२ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. यासाठी राज्य शासनाने योग्य नियोजन करावे. स्पर्धा जागतिक स्तरावरील असल्याने फुटबॉलप्रेमींना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी करावी. प्रशिक्षण आणि सरावासाठी खेळपट्ट्या तयार करण्यात याव्यात असेही पटेल यांनी सांगितले.राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी येथे सामने होणार आहेत. ही स्पर्धा आशिया खंडातील महिलांसाठीची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असून या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी सहभागी होणार आहेत. - ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन आधीच पात्र ठरले आहेत. तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा देखील यामध्ये समावेश होऊ शकतो.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment