मोठी बातमी, उज्ज्वल निकम यांना शिवसेनेकडून ऑफर? एकनाथ शिंदेंसोबत झाली गुप्त बैठक





 मोठी बातमी, उज्ज्वल निकम यांना शिवसेनेकडून ऑफर? एकनाथ शिंदेंसोबत झाली गुप्त बैठक


मुंबई: मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा खटला लढवणारे राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम (Advocate Ujjwal Nikam) यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करावा, अशी तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावात शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.एकनाथ शिंदे दोन दिवस जळगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी शिंदे यांनी शनिवारी उज्ज्वल निकम यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.मागिल महिन्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत धुळे आणि जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी सुद्धा राऊत यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी निकम यांची भेट घेतली. त्यामुळे सेनेकडून निकम यांना पक्षात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.उज्ज्वल निकम यांनी राजकीय पक्षात यावे हा शिवसेनेचा पहिलाच प्रयत्न नाही. याआधी सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा निकम यांनी राष्ट्रवादीत यावे, यासाठी प्रयत्न केले होते. राष्ट्रवादीकडून निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा इरादा होता. पण, निकम यांनी त्यावेळी नकार दिला. आताही सेनेकडून निकम यांना राज्यसभेवर खासदारकी देण्याचा प्रयत्न करू शकते. तसंच, चोपडा विधानसभा मतदारसंघात आरक्षण उठल्यास निवडणूक लढवण्याचा प्रर्याय सुद्धा उपलब्ध होऊ शकतो.मात्र, उज्ज्वल निकम यांनी राजकारणात प्रवेश करण्याबद्दल तुर्तास नकार दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. या भेटीत काय चर्चा झाली, याची तपशील सांगता येणार नाही. याआधीही मी शरद पवार यांचा प्रस्ताव नाकारला होता. संजय राऊत आणि माझी फक्त सदिच्छा भेट होती, राजकीय नेत्यांसोबत आपले चांगले संबंध आहे, त्यामुळे भेटी होत असतात, असं निकम यांनी स्पष्ट केलं.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments