महाराष्ट्रातील काही भागात सैम्य भूकंपाचे धक्के, सुदैवाने कोणती ही जीवितहानी नाही




महाराष्ट्रातील काही भागात सैम्य भूकंपाचे धक्के, सुदैवाने कोणती ही जीवितहानी नाही


हिंगोली : जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. परंतु हिंगोली करांसाठी भूकंप ही तशी नित्याचीच बाब झाली आहे. आज सकाळी 8 वाजून 33 मिनिटांना वसमत,औढा नागनाथ,कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचे धक्के जाणवले, त्यांच्या घरावरील पत्रे आणि भांडी हलू लागल्याने नागरीक घाबरुन घराबाहेर आले. यासगळ्यात चांगली बातमी अशी की हा धक्का सैम्य असल्या कारणाने कोणतीही जीवीत किंवा वित्तीय हानी झाली नाही. या भूकंपाची रिश्टरस्केलवर 4.4 इतक्या तीव्रतेची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या साधूनगर येथे आढळला आहे. National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून हिंगोली जिल्हा व्यवस्थापन कार्यालयाला ही माहिती मिळाली आहे. या भूकंपाची तीव्रता पूर्वीच्या भूकंपापेक्षा मोठी आहे, तर याची व्यापकता 65 किमीपर्यंत आहे, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठे ही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आलं आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या