टायर चोरांना एलसीबी पथकाने केले अटक..
भुसावळ:01-07-2021
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळालेली बातमी वरून भुसावळ येथून चोरीस गेलेले टायर हे तस्लिम खान सलीम खान रा.फेकरी ता. भुसावळ व योगेश तुकाराम बाविस्कर रा. फेकारी ता. भुसावळ यांचे कडे असेल्या बाबत सांगितले . व सूचना आणि मार्गदर्शन केले होते . त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले
त्या वरून वर नमूद इसमाची चौकशी करता त्यांनी सदर चे टायर हे सुनील शिरसागर इंगळे रा. नवा नगर खामगाव नाका बाळापूर जिल्हा अकोला ह.मू.कपिल वस्ती वरणगाव व शाहरुख बिसा कुरेशी रा. फेकरि ता. भुसावळ यांचे कडून घेतले बाबत सांगितले. असता स्थानिक गुन्हे शाखेची पथकांनी त्यांना फेकरि येथून ताब्यात घेऊन विचार पुस करता त्यांनी ते टायर गावर. कंट्रक्शन कंपनी हरियाणा या कंपनीतून चोरले असल्याचे कबूल केले. तसेच़ त्यांचा कडुन ७५००० रू. किमतीचे ०५ टायर असा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
त्या वरुन भुसावळ तालुका पो.स्टे .भाग ५ गु. र. न.११७/२०२१ भा.दं.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीस वैदेकिय तपासणी करून मुद्देमाल सह भुसावळ तालुका पो. स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कार्यवाही हे स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ.अशोक महाजन, स.फौ.शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख,पोना किशोर राठोड,पोकाँ. विनोद पाटील,पोकाँ रणजित जाधव,चा.पो का.मुरलीधर बारी अश्यांनी केली.

Comments
Post a Comment