छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा



छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


कोल्हापूर:-कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला (sugar factory) जर्मनी येथील टीयुव्ही कंपनीकडून पर्यावरण व्यवस्थापनातील आयएसओ 14001:2015 आणि गुणवत्ता व्यवस्थापनातील 45001:2018 ही दोन मानांकने मिळाली आहेत. अशा स्वरुपाची मानांकने मिळविणारा शाहू देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारखान्याला आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील 62 पुरस्कार मिळाले आहेत. अशी माहिती चेअरमन समरजित घाटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे उपस्थित होते.समरजीत घाटगे म्हणाले, आतापर्यंत शाहू कारखान्याचा (sugar factory) 62 पुरस्कारांनी गौरव झालेला आहे. 9001:2015 ( गुणवत्ता व्यवस्थापन कार्यप्रणाली ) ही जर्मनीची आयएसओ सर्टिफिकेशन मधील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. त्यांचेकडून आयएसओ 9001:2000 मानांकन 2002 साली मिळाले होते. व त्याची पुढील आवृत्ती 9001:2015 मानांकन 2018 ला मिळाले.कामामधील गुणवत्तेसाठी हे मानांकन आहे. या कार्यप्रणालीमुळे काम करण्याच्या पध्दतीमध्ये अमुलाग्र बदल होतो, कामामध्ये सुलभता येते, कामामधील अचुकता, सातत्य आणि सुधारणा याद्वारे गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार होण्यास मदत होते. अशा गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत होते.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments