चिपळूणात मुसळधार; शिव-वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ
चिपळूणात मुसळधार; शिव-वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ
चिपळूण : गेले दोन दिवस चिपळूण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मागील चोवीस तासांत येथे १०४.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली असून १ जून ते १९ जुलैपर्यंत १६६७ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत तालुक्यात ९७७ मि.मी. पाऊस झाला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने जोर धरला आहे. शहरातून वाहणारी शिव व वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत असून वाशिष्ठी नदीची सध्याची पाणी पातळी ३.६० मी. इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभर जोरदार पाऊस पडत असल्याने ही नदी दुथडी भरून वाहू लागली असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले असून महामार्गावरील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाचा जोर वाढत असून न.प.च्या वतीने नागरिकांसह व्यापाऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. शहरात पुराचे पाणी भरण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांनी सतर्कता
बाळगली असुन दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला आहे.
...................................
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment