पेढे येथील मातीच्या ढिगाऱ्याखालील आरुषचा शोध अद्यापही सुरूच
पेढे येथील मातीच्या ढिगाऱ्याखालील आरुषचा शोध अद्यापही सुरूच
रत्नागिरी : परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने घाटातील चार ते पाच वहाळाच्या मोऱ्या बुजवून त्याचे पाणी एकाच मोरीमध्ये सोडल्याने घाटाच्या दरीकडील डोंगर घसरल्याने सहा घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून होत्याचे नव्हते झाले. पेढे-कुंभारवडीतील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन वर्षाच्या बालकाचा अद्यापही शोध लागलेला नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून परशुराम घाटात काम करणाऱ्या कंपनीने हॉटेल ताजपासून खाली येणाऱ्या चार ते पाच जुन्या मार्गावरील मोऱ्या बुजवल्या. या सर्व मोऱ्यांमधील पाणी पेढे-कुंभारवाडीजवळील नाल्यामध्ये सोडण्यात आले आहे. पाच मोऱ्यांचे पाणी एकाच मोरीत सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात गेल्या काही दिवसात वाढ झाली होती. त्यातच चार दिवसापूर्वी पडलेल्या पावसात मोठ्याप्रमाणात पाणी या साचून डोंगराच्या मातीत मुरले. काही दिवसापूर्वी या भागात एक ट्रक पलटी झाल्याने दरड घसरली होती. या घसरलेल्या दरडीमधून पाणी वाहू लागले होते. चार दिवसापूर्वी पहाटे साडेपाच-पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या मोठ्या झोताबरोबर माती व दरड घसरुन खाली आली. यात मांडवकर कुटुंबीयांची सहा घरे गाडली गेली. यात अर्चना हरिश्चंद्र मांडवकर व त्यांची सून आरोही अविनाश मांडवकर यांचा माती खाली दबून मृत्यू झाला. यात आरोही यांचा मुलगा आरुष हा अद्यापही सापडलेला नाही. माती आणि पाण्याचा वेग एवढा होता की घराबाहेर आलेल्या तीनचार व्यक्ती शंभरदीडशे फूट वाहन गेल्या. या घरांमधील काही व्यक्ती मुंबईला असल्याने जिवीतहानी जास्त झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अर्चना मांडवकर यांच्या पतीचे वीस दिवसांपूर्वीच निधन झाले होते. वडिलांचे कार्य करुन त्यांचा मुलगा अविनाश घटनेच्या दोन दिवसापूर्वी मुंबईला गेल्याने बचावला. या आपत्तीला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी पेढे ग्रामस्थांन केली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या आरुषचा शोध अद्यापही सुरु असून एनडीआरएफची मदत घेण्यात येत आहे.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment