आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. घोंगडी बैठकीसाठी आमदार पडळकर सोलापुरात आले होते.
सायंकाळी आमदार पडळकर हे शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या वाहनातून घोंगडी बैठकीला आले होते.त्यावेळी त्यांच्या गाडीची काच फुटल्याचे समजले.कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीवर दगडफेक करून काच फोडल्याचे सांगण्यात येते.
शरद पवारांवरील टिकेनंतर आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचे समजते. घटना समजताच जोडभावी पेठे पोलीस चौकीचे पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले.कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.पोलिसांनी आमदार पडळकर यांच्यासोबत बंदोबस्त वाढवला आहे.दगडफेक नेमकी कोण केली की अन्य कारणामुळे गाडीची काच फुटली याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Post a Comment