इचलकरजीमध्ये नव्या कोरोना रुग्ण संख्येने माजली खळबळ

इचलकरजीमध्ये नव्या कोरोना रुग्ण संख्येने माजली खळबळ

बाधित रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याने गत काही दिवसांपासून इचलकरंजीत दिलासादायक वातावरण असताना बुधवारी ७१ बाधित रुग्ण मिळून आल्याने खळबळ (corona cases) उडाली आहे.

शहरातील विविध ३३ भागात ७१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून बिग बाजार परिसरातील ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मोठे तळे परिसरात तब्बल १२ जण बाधित आढळले आहेत. 

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट उद्भवली आहे. दररोज थोड्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण मिळून येत आहेत. त्यामध्ये मागील आठवडाभरात

बाधितांची संख्या (corona cases) कमी होण्यासह आणि मृत्यूचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळे शहरवासियांसह प्रशासनाला दिलासा मिळाला होता. परंतु बुधवारी बाधितांचा संख्या वाढल्याने खळबळ उडाली  आहे.

१ जुलैपासून दूध होणार महाग…

बुधवारी सायंकाळी प्राप्त अहवालात मोठे तळे परिसरात १२, जवाहरनगर परिसरात ५, नदीवेस नाका आणि सांगली रोड परिसरात प्रत्येकी ४, दत्त कॉलनी, सोलगे मळा, कृष्णानगर, कोल्हापूर रोड, कमला नेहरु हौसिंग सोसायटी परिसरात प्रत्येकी ३, शांतीनगर, आरके नगर, जुना चंदूर रोड, दत्त मंदिर परिसर, हत्ती चौक, तुळजाभवानी अपार्टमेंट, भोईनगर व एएससी कॉलेज परिसरात प्रत्येकी २ तर चावरे गल्ली, लक्ष्मी व्यंकटेशनगर, कामगार चाळ, यशवंत कॉलनी, गुजरी पेठ, श्रीपादनगर, भारतमाता हौसिंग सोसायटी, रामनगर, सॅफ्रॉन हॉटेल  परिसर, स्टेशन रोड, मंगळवार पेठ, दत्तनगर, शेळके मळा, दाते मळा परिसरात प्रत्येकी १ रुग्ण मिळून आला आहे. 

खुशखबर, खाद्यतेल आणखी स्वस्त होणार

उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं 

आजअखेर एकूण बाधितांची संख्या ८०३६ झाली असून सध्या ३८६ जणांवर उपचार सुरु आहेत. आजवर ७२७४ जणांनी कोरोनावर मात केली असून ३७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Comments