रत्नागिरीतील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि आंबा व्यवसायिक राजेश उर्फ राजू बाष्टे यांचे निधन



  रत्नागिरीतील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि आंबा व्यवसायिक राजेश उर्फ राजू बाष्टे यांचे निधन


 सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूनसोबत देखील जोडली होती राजू बाष्टे यांची क्रिकेट कारकीर्द 


 रत्नागिरी : शहरातील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि आंबा व्यवसायिक राजू बाष्टे यांचे काल वयाच्या 51 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. राजू बाष्टे हे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. त्यांचे बालपणीचे काही शिक्षण मुंबईत बालमोहन विद्यालयात झाले. यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्या संघामधून फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी अनेक सामने खेळले होते. सुमारे 22 वर्षांपूर्वी रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या रामनाथ पारकर गौरवनिधी सामन्यात सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन, विनोद कांबळी यांनी देखील आपला सहभाग नोंदवला होता. या दिग्गज खेळाडूंच्या सोबत खेळण्याची संधी देखील राजू बाष्टे यांना मिळाली होती. रत्नागिरी मारुती मंदिर येथे राजू बाष्टे यांचे ज्यूस सेंटर असून त्याचा आंबा व्यवसायाचा विस्तार देखील मोठा होता. एक हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून राजू बाष्टे यांची जनमानसात ओळख होती. काल सायंकाळी कोल्हापूर येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5:30 मी त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments