संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आज बंद



संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आज बंद

 पुणे : पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (१ जुलै) विद्युत आणि पंपिंग तसेच स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२ जुलै)  सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत.

पर्वती जलकेंद्र – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता.

वडगाव जलकेंद्र – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक

चतु:शृंगी- एसएनडीटी, वारजे जलकेंद्र – पाषाण, औंध, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलेज परिसर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी आणि भूगांव रस्ता

लष्कर जलकेंद्र – लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, वडगावशेरी, चंदननगर,खराडी, गोंधळेनगर आणि सातववाडी

नवीन होळकर पंपिंग – विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि नगर रस्ता.

...................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025



Comments