यूपी ATS ची मोठी कारवाईत अल कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक, शस्त्रास्त्रांसह स्फोटकांचा साठा जप्त




यूपी ATS ची मोठी कारवाईत अल कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक, शस्त्रास्त्रांसह स्फोटकांचा साठा जप्त


लखनऊः लखनऊ शहरातील काकोरी पोलिस ठाण्याच्या भागातील दुबग्गा परिसरात उत्तर प्रदेश ATS ची ७ तासांहून अधिक वेळ कारवाई कारवाई सुरू होती. या तपासात ATS चे कमांडोही सहभागी होते. एका गॅरेजमध्ये अल कायदाचे दहशतवादी लपल्याची माहिती ATS ला मिळाली होती. यानंतर ATS ने छापा मारत कारवाई केली. यात दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आलं आहे. या प्रकरणी ५ दहशतवादी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. तीन घरांमध्ये ATS च्या कमांडोंकडून तपासणी सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळल्याचंही सांगण्यात येत आहे. यात कुकर आणि टायमर बॉम्बही आहेत. 'अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवाही  हे अल कायदाच्या अन्स गझावत उल हिंद या  संघटनेचे आहेत', उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.ATS आजूबाजूच्या ५०० मीटर परिसरातील घरं रिकामी केली आहे. संपूर्ण भागाला सील केले आहे. स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचं साहित्य मिळालं आहे, असं ATS च्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. बॉम्ब निरोधक पथकही बोलावण्यात आलं आहे. अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, असं बोललं जात आहे. काही बडे नेतेही त्यांच्या टार्गेटवर होते.

५ दहशतवादी पळाल्याची माहिती

पकडण्यात आलेल्या २ दहशतवाद्यांचे ५ साथीदार एटीएसच्या कारवाईपूर्वी पळाल्याची माहिती आहे. यासोबतच लखनऊला लागून असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायबरेली, सीतापूर, बाराबंकी सीमेवर कडक तपासणी करण्यात येत आहे. कारवाईसाठी ATS ची टीम गेल्या आठवड्यापासून तयारी करत होती.

काश्मीरच्या AQIS मॉड्यूशली धागेदोरे

पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे धागेदोरे हे जम्मू-काश्मीर सीमेवर सक्रिय असलेल्या AQIS मॉडेलशी जुळले आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मूत झालेल्या एका स्फोटातील दहशतवादी हा लखनऊमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती. मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. एका घरातून ४ काळ्या बॅग भरून स्फोटोकं सापडली आहेत.


२ प्रेशकर कुकर जप्त

पकडण्यात आलेला दहशतवादी शाहिद याच्या घरातून २ प्रेशन कुकर बॉम्ब, टाइम बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी ७ किलो स्फोटकं आणि त्यासंबंधी साहित्य जप्त करण्यात आलं आहे.


>घरामध्ये IED स्फोटकंही सापडली आहेत. प्रेशर कुकरमध्ये टायमर डिव्हाइस लावून स्फोट घडवण्याचा कट होता

>घरात लावण्यात आलेली एक जाळीही कापण्यात आली आहे. त्यातही स्फोटकं लपवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

>लखनऊमध्ये अल कायदाचे दोन संशयित ताब्यात; पोलिस आणि ATS ला मोठं यश

कुटुंबीयांचीही होतेय चौकशी

पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं शाहिद आणि वसिम अशी आहेत. तर रियाज आणि सिराज यांच्या घरात तपासणी केली जात आहे. सर्वांची चौकशी केली जात आहे. शाहिदचे घर सील करण्यात आले आहे. कमांडो घरात आहेत. तिघांची घर लागून आहेत. लखनऊच्या मडियांवमधून एका संशियताला ताब्यात घेतलं आहे.

                                                   एक दहशतवादी उन्नावचा

एका दहशतवाद्याचे नाव शाहिद उर्फ गुड्डू आहे. तो उन्नावचा राहणारा आहे. त्याच्याच घरता दुसरा दहशतवादी लपला होता. दोघांनी प्रशिक्षिण घेतलं आहे. आता एटीएसचे एक पथक उन्नावला रवाना झाले आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments