'पणदेरी धरणातील 80 टक्के पाणीसाठा कमी करा' : खासदार विनायक राऊत


'पणदेरी'धरणातील 80 टक्के पाणीसाठा कमी करा' : खासदार विनायक राऊत


रत्नागिरी: पणदेरी धरणातील पाणीसाठा 80 टक्के कमी करा, धरणाचे दरवाजे कायम उघडे ठेवा, अशा काही सतर्कतेच्या सूचना शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. खासदार विनायक राऊत आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पणदेरी धरणाची पहाणी केल्यानंतर गळती रोखण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला गळती लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे धरण परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, आ. योगेश कदम यांनी तत्काळ पणदेरी धरणाची पहाणी केली. या पहाणीनंतर धोका टाळण्यासाठी धरणातील 80 टक्के पाणीसाठा कमी करा, धरणाचे दरवाजे कायम उघडे ठेवा आणि सांडवा एका फुटाऐवजी तीन फूट फोडा तसेच सतर्क रहाण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments