कोकणात कायम स्वरूपी उपाययोजनेसाठी 3 हजार 700 कोटींचे पॅकेज, राज्य सरकारचा मोठा निर्णय
कोकणात कायम स्वरूपी उपाययोजनेसाठी 3 हजार 700 कोटींचे पॅकेज, राज्य सरकारचा मोठा निर्णय
रत्नागिरी:- रायगड (Raigad) आणि रत्नागिरीत (Ratnagiri) झालेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण (Flood due to heavy rain) झाली. या महापुराच्या संकटात दरड सुद्धा कोसळण्याच्या (Landslide) घटना घडल्या आणि अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. कधी चक्रीवादळ, कधी पूर तर कधी दरड कोसळण्याच्या घटना यामुळे कोकणी माणूस नेहमीच संकटात सापडत असतो. कोकणवासियांवरचे हे संकट कायमस्वरूपी टाळण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टी भागाचा पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत आणि पुनर्विकासमंत्री विजय वडेट्टीवार दाखल झाले. खेड (Khed) येथील पाहणी दौऱ्यात विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले की, सातत्याने कोकणात विविध संकट येत आहेत. गेल्या चार वर्षांत तीन वेळा विविध संकट आली आहेत. या संकटावर मात करण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना म्हणून भूमिगत वीज केबल टाकण्याची आवश्यकता आहे. कायम स्वरूपी उपाययोजना केल्या जातील. कारण पूर, वादळ आल्यावर वीज यंत्रणा ठप्प होते. भूमीगत वीज केबल असल्यास वीजेचं संकट निर्माण होणार नाही. कायमस्वरूपी उपाययोजना नक्की केल्या जातील आणि त्यासाठी आम्ही आता 3700 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समितीने मान्य केले आहे.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment