मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 22 गावांत कडक लॉकडाऊन




 मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 22 गावांत कडक लॉकडाऊन



अहमदनगर जिल्ह्यातील 22 गावांत 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन (lockdown) जाहिर करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 22 गावांत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन (lockdown) काळात गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत.लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. तसंच विनामास्क फिरणारे, चौकात पारावर विनाकारण बसणारे, फिरणारे यांचे फोटो काढुन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.रुग्णसंख्या वाढीनं चिंता वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची दखल घेतली. अहमदनगर जिल्ह्यातून रूग्णसंख्या वाढत असताना महत्वाचा निर्णय घेण्यात आला.अहमदनगर जिल्ह्यातील 22 गावांत 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला. पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांत झपाट्यानं वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुख्यमंत्र्यांनी कोरोना स्थितीची दखल घेत बाहेरुन येणा-यांचं 7 दिवस विलगीकरण सक्तीचं केलं आहे


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या