तब्बल 19 तासांनी कोकण रेल्वे रुळावर !




 तब्बल 19 तासांनी कोकण रेल्वे रुळावर ! 


रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावर गोवा राज्यातील करमाळी आणि थिव्हिम स्टेशन दरम्यान असलेल्या जुना गोवा बोगद्यात सतत मुसळधार पावसामुळे सोमवारी ट्रॅक वर माती व पाणी आल्याने सोमवारी पहाटे 4 वाजल्यापासून ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल 19 तासांनी रात्री 11.30 मी. नी पूर्ववत झाली.थिव्हिम स्टेशन दरम्यान असलेल्या जुना गोवा बोगद्यात सतत मुसळधार पावसामुळे सोमवारी ट्रॅक वर माती व पाणी आल्याने या ट्रॅक वरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या कालावधीत सर्व गाड्या नजीकच्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.कालांतराने काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.याचा मोठा परिणाम रेलवे वाहतुकीवर झाला होता.मात्र सोमवारी रात्री 11.30 वाजता रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.


...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025 

Comments