कुटुंबप्रमुखाचा covid-19 मृत्यू झाल्याच्या स्थितीत चर्मकार समाजासाठी कर्ज योजना

 



कुटुंबप्रमुखाचा covid-19 मृत्यू झाल्याच्या स्थितीत
चर्मकार समाजासाठी कर्ज योजना


रत्नागिरी : -राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ,नवी दिल्ली यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविङ-१९ या महामारीमुळे ज्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यु पावली आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास एन.एस.एफ.डी.सी,नवी दिल्ली यांचेमार्फत रु.५ लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. यामध्ये एन.एस.एफ.डी.सी कर्ज ४  लाख रुपये व भांडवली अनुदान १ लाख रुपये असणार आहे. यासाठी कर्जासाठी व्याजदर  ६ टक्के असणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी मयत व्यक्तीची आवश्यक माहिती

१) मयत व्यक्तीचे नांव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोटजात, मृत्यूची दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. 

२) कुटूंबातील व्यक्तींची एकुण संख्या, कुटूंबातील प्रमुख वारसदार, कुटूंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न(रु.३.०० लाखाच्या आत).

            कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावी असे जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांनी कळविले आहे.

याची  लिंक https://forms.gle/Q485fSUQYEu 


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025




Comments