मासे गरविण्यासाठी समुद्रात गेलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले



 मासे गरविण्यासाठी समुद्रात गेलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले 


गुहागर: गुहागर तालुक्यातील आरे गावचे दोन युवक गुहागर-आरे येथील खडपात मासे गरविण्यासाठी गेले असता दुसरा दिवस उजाडला तरी ते परत न आल्याने शोध घेतला असता मंगळवारी या दोघांचेही मृतदेह हाती आले आहेत. या दोन्ही युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.आरेगावमधील सोमवारी २१ जूनला सायंकाळी मासे गरवायला गेलेल्या दोन तरुणाचे मृतदेह सापडले आहेत. गुहागर तालुक्यातील बागेतील पाचमाड परिसरातमासेमारीसाठी हे समुद्रावर गेले होते. हे तरुण परत आले नाहीत. त्यामुळे दोघेही समुद्रात बेपत्ता झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती.ग्रामस्थ आणि पोलीस या दोन तरुणांचा शोध घेत होते. सिद्धांत संदेश साटले (वय २३) रहाणार आरे कलमवाडी आणि प्रतीक किसन नावले (वय २५) रहाणार आरे नागदेवाडी अशी या दोन तरुणांची नावे असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025



टिप्पण्या

news.mangocity.org