ग्राहकांना मोठा धक्का! लॉकडाऊन संपला, उद्यापासून महावितरण पुन्हा करणार बिलांची वसुली



 ग्राहकांना मोठा धक्का! लॉकडाऊन संपला, उद्यापासून महावितरण पुन्हा करणार बिलांची वसुली



मुंबई : करोनाच्या जीवघेण्या संकटात पहिल्या लॉकडाऊनवेळी वीज बिल माफी दिल्याच्या आश्वासनाने आव्वाच्या सव्वा आलेली बिलं लोकांनी भरलीच नव्हती. पण लॉकडाऊन उठताच महावितरणाने शक्ती लावून लोकांकडून बिलं वसूल करून घेतली. आता दुसरंही लॉकडाऊन संपलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणकडून वसुली केली जाणार आहे. अधि माहितीनुसार, उद्यापासून बिलांची वसुली मोहीम राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.लॉकडाउनच्या काळात दुकाने, उद्योगधंदे, व्यापार ठप्प असल्यामुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवलं. अशातच महावितरणने भलीमोठी बिल पाठवून नागरिकांना आणखी आर्थिक संकटात टाकलं. यामुळे सत्ताधाऱ्यांनी वीजबिल माफीची पुडी सोडली आणि लोकांना आव्वाच्या सव्वा बिलं आली. लॉकडाऊन संपताच महावितरणाने शक्कल लढवून लोकांकडून बिलांची वसुली करून घेतली. कधी मीटर बंद तर कधी डीपी बंद करून लोकांकडून बिलं वसूल करण्यात आली.आता दुसरं लॉकडाऊनही संपलं आहे. त्यामुळे उद्यापासून थकित बिलं वसूल करण्याचे आदेश महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लॉकडाऊन उठलं असलं तरी नागरिक अजूनही आर्थिक संकटातून सावरले नाहीत. अशात आता महावितरण बिलांसाठी मागे लागल्यामुळे नागरिकांना शॉक बसणार हे नक्की.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


टिप्पण्या