तिसऱ्या लाटेचे संकेत?; 'या' जिल्ह्यात ९ हजारांहून अधिक मुलांना करोनाची लागण
तिसऱ्या लाटेचे संकेत?; 'या' जिल्ह्यात ९ हजारांहून अधिक मुलांना करोनाची लागण
अहमदनगरः राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचं संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात नऊ हजारांहून अधिक लहान मुलांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.अहमदनगर जिल्ह्यात मे महिन्यात ९ हजार ९२८ अल्पवयीन मुलांना करोनानं गाठलं आहे. करोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यानं लहान मुलांमध्येही करोना संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखर्णा यांनी दिली आहे. तसंच, गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये सात हजार ७६० लहान मुलांना करोनाची लागण झाली होती. पण आजपर्यंत कोणाचीही प्रकृती गंभीर झालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.लहान मुलं बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक ग्रामीण भागात जास्त आहे. तिथं संसर्ग जास्त आहे. राज्यात अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहे. लहानशा घरात अनेक लोकं एकत्र राहतात. त्यामुळं संसर्ग फैलावण्याचं प्रमाणही वाढतं. त्यामुळं घरातील मोठ्या व्यक्तींकडून लहान मुलांना लागण होते, असं टास्क फोर्सचे सदस्य सचिन सोलट यांनी म्हटलं आहे. सोलट यांच्या निरीक्षणानुसार, मेमध्ये संसर्ग झालेल्या ९६- ९७ टक्के मुलांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती.करोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग अधिक होता. या लाटेत तरुणांना अधिक फटका बसला. त्याचे कारण म्हणजे नियमांकडे दुर्लक्ष केलं गेलं. अनेक करोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही त्यामुळं संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले, असं मत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केलं आहे.अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी खबरदारी घेत करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना आखल्या आहेत. जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांसोबत चर्चा सुरु केली आहे. त्यामुळं पुढील उपाययोजना आखण्यात मदत होईल. खासगी रुग्णालयात लहान मुलांसाठी कोविड वॉर्ड उभारावे, अशा सूचना केल्या आहेत, अशी माहिती संग्राम जगताप यांनी दिली आहे. तसंच, प्रशासन लवकरच राज्य सरकारकडून करोना संसर्ग झालेल्या मुलांसाठी औषधं आणि अन्य वस्तूंसाठी मागणी करेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment