बाबा:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास




 बाबा


पप्पा, बाबा, डॅडी

त्यांची खूप नावे

जन्मदाते तेच

त्यांचे गुण गावे


आईचा हा पती

मुलांचा तो बाप

कुटुंबासाठीच

सोशी खूप ताप


घरचा विठ्ठल

कष्ट करी भारी

सदा पाठी उभा

देतो तो उभारी


चुकीलाच शिक्षा

स्वभाव करारी

लेकरास साथ

घेण्यास भरारी


ठाम राही उभा 

संकटाच्या काळी

फाडून तो फेकी

अरिष्ठा ची जाळी


तुम्हा साठी देह

झिजवितो बाप

स्वप्न करा पुरी

पाठी देई थाप


श्री. युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता:- बार्शी
      जिल्हा:- सोलापूर
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 




२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025



Comments