लांजा शहरातील राष्ट्रीय महामार्ग ६६ रस्त्यावरिल खड्डे भरुन वाहतुकीस योग्य न केल्यास वृक्षारोपण करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा




 लांजा शहरातील राष्ट्रीय महामार्ग ६६ रस्त्यावरिल खड्डे भरुन वाहतुकीस योग्य न केल्यास वृक्षारोपण करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा


रत्नागिरी:-लांजा शहरात राष्ट्रीय महामार्गाची रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अभिजित राजेशिर्के यांनी लांजा तहसिलदार यांना निवेदन देवून रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे लांजा शहरात पर्यायी मार्ग सुरू केले आहेत. पर्यायी रस्ता हा फक्त माती व खडीने तयार केला आहे. त्यामुळे पावसामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. तसेच संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच चिखलामुळे दुचाकीचे अपघात होत आहेत. तसेच पायी प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर वाहनांमुळे चिखल उडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात लांजा शहरातील महामार्गावरील खड्डे बुजवून वाहतुकीसाठी चांगला न केल्यास राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी लांजा यांच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.तहसीलदार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस अभिजित राजेशिर्के, तालुका खजिनदार संजय खानविलकर, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, शहर युवकाध्य‌क्ष दिपक शेट्ये, मारूती गुरव, अनिकेत शेट्ये व दाजी गडहिरे उपस्थित होते.



.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments