सावखेडासिम प्रा. आरोग्य केंद्राकडून हिवताप प्रतिरोध मोहीमे बाबत जनजागृती
सावखेडासिम प्रा. आरोग्य केंद्राकडून हिवताप प्रतिरोध मोहीमे बाबत जनजागृती
दहिगाव ता. यावल :- जागतिक महामारी कोरोना च्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लढा देत असताना पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात किटकजन्य व जलजन्य आजार उद्भभवत असतात.हिवताप विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी आरोग्य विभागामार्फत जून महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो. या उपक्रमाद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. कोरोना सोबतच किटकजन्य व जलजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग, व आरोग्य सेवक सज्ज झालेला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार व जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात तसेच ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व यावल - रावेर चे ता. हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात १ ते ३० जून २०२१ यादरम्यान हिवताप प्रतिरोध महिना साजरा करून जनजागृती करण्यात येत आहे.या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, डॉ. गौरव भोईटे, आरोग्य सहाय्यक एल जी तडवी, व प्रयोगशाळा तंत्रज्ञ कल्पेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडासिम प्रा. आ. केंद्राच्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रात व गावात आरोग्य सेवक हे सर्वेक्षण व जनजागृती करीत आहेत. कोरपावली ता यावल फिरोज तडवी येथून जवळच असलेल्या दहिगाव येथे राजेंद्र बारी, सावखेडासिम येथे संजय तडवी, मोहराळा येथे बालाजी कोरडे, सातोद, व कोळवद येथे भुषण पाटील, तर आदिवासी व अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेले गाड्रया - जामन्या येथे अरविंद जाधव हे सर्व आरोग्य सेवक आशा सेविका सह प्रत्येक गावात कंटेनर सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, ग्रामपंचायत कडून गटारी वाहत्या करणे, पाण्याची डबकी बुजने किंवा वाहती करणे किंवा क्रुड ऑईल टाकणे, प्रत्येक आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, माहिती पत्रके वाटणे, भिंतीवर म्हणी लिहिणे, तापाच्या रुग्णाचे रक्त नमुने घेऊन औषध उपचार देणे, व गट सभा घेऊन नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे. अशा प्रकारे हिवताप, डेंगू, व चिकनगुनिया या किटकजन्य आजारांना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून व जनजागृती करून हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे जनतेचा सहभाग व दरवर्षी आरोग्य कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीमुळे हिवताप रुग्ण शून्यावर आलेले आहेत. ही एक समाधानाची बाब आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment