कोविड १९ पॉझिव्हिटी रेट कमी करण्यासाठी रत्नागिरी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न
कोविड १९ पॉझिव्हिटी रेट कमी करण्यासाठी रत्नागिरी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न
१.जास्तीत जास्त टेस्टिंग करुन टेस्टिंगची संख्या वाढविणे, जेणेकरुन टेस्टिंगचे प्रमाण वाढले की बाधित रुग्णांची संख्या वाढेल पण त्यामुळे तातडीने उपचार करणे शक्य होईल. आपल्या जिल्हयात बरेचसे लोक लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष करत आहेत. त्यामळे कोरोनाचा फैलाव जास्त होतो आहे म्हणून स्वत: नागरिकांनी पुढाकार घेऊन टेस्ट करुन घेणे गरजेचे आहे. जर कोणत्याही गावात किंवा शहरात कोरोनाचे लक्षण असलेले लोक टेस्टिंगसाठी तयार होत नसतील किंवा विरोध करत असतील तर पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांचे पथक यांचेद्वारे विरोध करण्या-या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील.
२.कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुयोग्य व अधिक सक्षमतेने करणे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांमुळे अधिक फैलाव होणार नाही. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी स्वत: पुढे आले पाहिजे. स्वत: सहीत आपल्या जवळच्या लोकांनाही धोका होणार नाही. यामुळे अदृश्य केसेस समोर येतील. यामुळे होणारा फैलाव आटोक्यात येईल.
३.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे ज्यामुळे त्यांच्याद्वारे आणखी फैलाव होणार नाही. यामध्ये ६० वर्षपेक्षा जास्त वय असणा-या जेष्ठ लोकांना संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करण्यात आलेले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा योग्य सोयी असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आणि लहान मुले असणारे पालक यासारख्या जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या निर्देशनुसार एकूण ५ निकषात बसणा-या लोकांना स्टॅम्पिंग करुन गृह विलगीकरणात राहता येईल. यामुळे निश्चितच फैलाव रोखण्यास मदत होईल. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार ग्रामविकास विभागाद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारित येणा-या सर्व ग्रामपंचायतींना दिलेले आहेत. सहाजिकच यामध्ये ग्रामसेवकांची भूमिक मोठी असणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी कोरोनावर मात करण्यासाठी जिद्य उत्पन्न व्हावी यासाठी कोवीड-१९ व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ५ पथके काम करतील. यात कुटूंब सर्व्हेक्षण, विलगीकरण कक्ष, वाहन चालक पथक, कोवीड हेल्पलाईन पथक व लसीकरण पथक याचा समावेश होतो. सदर पुरस्कार योजनेत प्रत्येक गावाने कोरोनाला रोखण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलेले आहेत. सहाजिकच यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचा सहभाग अतिशय महत्वाचा ठरतो. जेणेकरुन प्रत्येक गाव कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होईल. आपल्या जिल्हयामध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक निबंधांची अंमलबजावणी सुरु तर आहेच शिवाय विनाकारण फिरणारे किंवा मास्क न वापरणारे यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मोकाटपणे फिरणा-यांना पोलीसांद्वारे पकडून दंडात्मक कारवाई सहीत टेस्टही करण्यात येत आहेत. एकूणच सर्व यंत्रणा समन्वय ठेवून आपल्या जिल्हयाचा कोरोना पॉझिव्हिटी दर कमी करण्यासाठी झपाटून कामाला लागलेल्या आहेत.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment