"देशातील आरक्षण संपविण्याचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अजेंडा"
नांदेड : मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो नोकरीतील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय असो किंवा मुस्लिम आरक्षणाचा विषय असो, हे सर्व विषय केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे अडचणीत आले आहेत. ओबीसी समाजाच्या जनगणनेचा डाटा मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिला नाही म्हणून ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. एकूणच भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशातील आरक्षण संपविणे हा अजेंडा असून या अजेंडाची अंमलबजावणी करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. (guardian minister ashok chavan said that the central government has conducted a census of OBCs)
लातूर - नांदेड महामार्गावर भाजपाचा दोन तास चक्का जाम
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या संदर्भात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम पुतळ्यास अभिवादन करून उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पालकमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ओबीसीची केंद्र सरकारने जनगणना केली आहे. त्यांच्याकडे ओबीसी लोकसंख्येचा डाटा उपलब्ध आहे. परंतु हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले आहे. हे आरक्षण घालवण्यामागे केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा हात आहे.
नांदेड जिल्ह्यातील साठवण तलावांची कामे मार्गी लावा- अशोक चव्हाण
Comments
Post a Comment