सावर्डे येथे अपघात करून फरार झालेल्याचा तब्बल १० वर्षानंतर मुसक्या आवळल्या
सावर्डे येथे अपघात करून फरार झालेल्याचा तब्बल १० वर्षानंतर मुसक्या आवळल्या
रत्नागिरी : सावर्डे येथे १० वर्षांपूर्वी अपघात करून फरार झालेल्या संशयित आरोपीला रत्नागिरी पोलिसांच्या शोध पथकाने सोमवारी धुळे येथून ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या फरारी शोध पथकाने ही कामगिरी केली. नजमुद्दीन सोराब खान (वय ४८, रा. शिवडी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अकरा वर्षांपूर्वी ९ डिसेंबर २०१० रोजी सावर्डे येथील गिजगिजमा मशिदीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला त्याने तवेरा गाडीने धडक देत अपघात केला होता. अपघातानंतर तो फरारी झाला. दरम्यान त्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात तवेरा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे आणि फरारी शोध पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, पोलीस नाईक जाधव, दरेकर, खांबे आणि पोलीस कॉन्स्टेबल मुजावर यांनी विविध ठिकाणी विविध प्रकरणी झालेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे. तो करताना धुळे येथे त्या चालकाचा शोध लागला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
.....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
.....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment