गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने जाहीर केली नियमावली



 गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने जाहीर केली नियमावली


संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा नकोचयंदाच्या गणेशोत्सवदरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जातीये. गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशाप्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जात आहे.


गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 


* गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.

* कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

*सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी

*विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.

* नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.

* शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.

*सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत

* आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.

*नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.

* गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments