ओणी येथील शॉपी फोडून मोबाईल लांबवले




 ओणी येथील शॉपी फोडून मोबाईल लांबवले


राजापूर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी कोंडीवळे येथील मोबाईल शॉपी फोडून अज्ञान चोरट्याने ६९ हजार ९०० रूपये किमतीचे मोबाईल हॅन्डसेटची चोरी केल्याची तक्रार दिव्या दिलीप कुलपे (२८) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. शनिवार दि. २९ मे रोजी सायंकाळी ६ ते ३० मे सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यानच्या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी दिव्या कुलपे यांच्या मालकीचे ओणी कोंडीवळे येथे गणेश मोबाईल अॅण्ड इलेक्ट्रिकल्स हे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता दुकान बंद करून त्या घरी गेल्या. सकाळी ८ वाजता फिर्यादी यांचे दीर अशोक कुलपे हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे कुलूप व शटर तोडलेले असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments