आमदार योगेश कदम यांनी दापोली तालुक्यातील देगांवमधील शेतकरी बांधवांना केले हळद रोपांचे वाटप
आमदार योगेश कदम यांनी दापोली तालुक्यातील देगांवमधील शेतकरी बांधवांना केले हळद रोपांचे वाटप
रत्नागिरी:-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देगांवमधील शेतकरी बांधवांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले.आमदार योगेश कदम यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना हळद लागवडबाबत शेतकर्यांमध्ये आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने गावांगावांत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याच्या सूचना केली होती. त्याअनुषंगाने कोकण कृषी विद्यापीठाने शिबीर घेत हळद लागवड लाभार्थींची सूची तयार केली.दापोली तालुक्यातील देगांवमधील सुमारे ३५ शेतकरी यांनी हळद लागवडबाबत उत्सुकता दाखवली. यांमध्ये बाळकृष्ण गोपाळ बारे, अशोक गंगाराम कदम, मोहन देवजी भागणे, रामचंद्र गणपत गोलांबडे, अभिषेक सुर्वे, किशोर सुर्वे यांसहित उर्वरीत शेतकरी बांधवांचा समावेश आहे. आपली कोकणातील जमीन हळद लागवडीसाठी पोषक असून इथे खर्या अर्थाने पिवळे सोने उगवेल आणि त्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असुन त्याचाच एक भाग म्हणून दापोली, खेड व मंडणगडमध्ये हळद लागवडीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५.५० लाख ( ५ लाख ५० हजार ) घेणार आहे.महाराष्ट्र शासनाकडून राज्यात ४५ % अनुदान निव्वळ ठिबक सिंचनासाठी मिळते. याच आधारे कोकणासाठी विशेष बाब म्हणून ठिबक संचनासाठी ८०% अनुदान मिळावे अशी मी आग्रही मागणी करणार आहे. असे प्रतिपादन योगेश कदम यांनी व्यक्त केले.दापोली, खेड व मंडणगडमध्ये सुमारे ५ हेक्टर जमिनीमधून हळद लागवडीचे उद्दीष्ट ठेवले असून त्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढे यावे व आपल्या पारंपारिक शेतीसोबतच नवीन व्यावसायिक शेती करावी असे आवाहन करतो.सुदैवाने भरपूर कालावधीनंतर आपल्या दापोली मतदारसंघाला व दापोली तालुक्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन खाते मिळाले आहे व दापोली तालुक्यामध्येच कोकण कृषी विद्यापीठसूध्दा आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी बांधवाची योग्य सांगड मी कोकण कृषी विद्यापीठासोबत घालून देणार आहे.तसेच कृषी व पशुसंवर्धन या खात्याशी निगडीत सर्व योजना सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहचविणे हे माझे ध्येय असून प्रत्येक महिन्यातला एक कृषी व पशुसंवर्धनसाठी राखीव ठेवणार असून शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे असे मनोगत आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केले.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, रत्नागिरी जि. प. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सौ. रेश्मा झगडे, उपजिल्हाप्रमुख व दापोली तालुका खरेदी विक्री केंद्राचे चेअरमन सुधिर कालेकर, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जि. प. समाजकल्याण समिती सभापती भगवान घाडगे, असोंड जिल्हा परिषद गटाचे सदस्य अनंत करबेले, दापोली शिवसेना तालुकासंघटक उन्मेष राजे, असोंड पंचायत समिती गण सदस्या सौ. वृषाली खडपकर, उपविभागीय कृषी अधिकारी दिपक कुटे, उपतालुकाप्रमुख प्रभाकर गोलांबडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य व वाकवली गावचे सरपंच निलेश शेठ, कोकण कृषी विद्यापीठ शिक्षण व विस्तार विभागप्रमुख डॉ. प्रमोद सावंत, प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल माळी, विभागप्रमुख मोहन भागणे, शिवसहकार सेना दापोली तालुका संघटक विवेक खडपकर, उपविभागप्रमुख संदिप मांडवकर, दिनेश जावळे, शिरावणे गावचे सरपंच सागर रेमजे, विश्वास खांबे, भडवळे गावचे सरपंच विजय नाचरे उपस्थित होते.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment