करावे नेत्रदान.…:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
करावे नेत्रदान.…
हसताना सुद्धा कधी कधी
डोळ्यात येतात आसवे ।
पण अचूक भाव दर्शवितात डोळे
ते कधीच नसतात फसवे ।।
डोळ्यांमुळे पाहू शकतो
डोळ्यांमुळे दाखवू शकतो ।
रडणाऱ्यालाही आपण नेहमी
डोळ्याच्या कलेने हसवू शकतो ।।
दुःख काय डोळे नसण्याचा
ते तर फक्त अंधांनाच माहीत ।
या झगमगीच्या दुनियेत सांगा
जपणार कोण बरे त्यांचे हित? ।।
नकल करून अंध असण्याचा
टवाळखोर मुलं दुखवतात त्यांना ।
का अशी वागतात काही मुलं
माणुसकीचे धडे तर मिळालीत सर्वांना ।।
स्वतःच्या करमणूकीसाठी कोणी
देऊ नका दुःख निष्पाप अंधांना ।
या स्वर्गमय दुनियेत जगण्याचा
अधिकार आहे प्रत्येकांना ।।
शक्य असल्यास मरायच्या आधी
प्रत्येकांनी करावे नेत्रदान ।
मरूनही तुम्ही दुसऱ्यामुळे
दृश्य बघसाल सृष्टीतील छान छान ।।
ता.दारव्हा,जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment