कोल्हापुरातील पावसाची गती कायम; पंचगंगेच्या पातळीत तीन फुटांनी वाढ

 

       



कोल्हापुरातील पावसाची गती कायम; पंचगंगेच्या पातळीत तीन फुटांनी वाढ





कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यतील पाणलोट क्षेत्रातील पावसाची गती कायम आहे. शहरासह पूर्वेकडील भागात शुक्रवारी पावसाची उघडझाप सुरू होती. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तीन फुटांनी वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यत आजही जोरदार पाऊस झाला. पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे पंचगंगा, ताम्रपर्णी, कुंभी, कासारी, भोगावती या नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरात आज पावसाची उघडझाप सुरू होती. येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये तासाला दोन इंच याप्रमाणे वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत तीन फूट पाणीपातळी वाढली आहे. राजाराम बंधाऱ्यावर आज सायंकाळी पाणीपातळी ३३ फूट ४ इंच होती. एकूण ५६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ही संख्या एकने वाढली आहे. कासारी नदीवरील वालोली, बाजार भोगाव तसेच वेदगंगा नदीवरील करडवाडी येथील बंधारा खुला झाला आहे.

नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज पहाटे पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. निम्म्याहून अधिक मंदिर कृष्णा नदीच्या पाण्याखाली आहे. नदीची पातळी कालपासून पंधरा ते वीस फुटांपर्यंत वाढली आहे. नदीचे पाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे श्री चरण कमलावरून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. करोना महामारीमुळे दर्शन बंद असल्यामुळे भाविकांना पर्वणी स्नानाचा आनंद लुटता आला नाही, अशी खंत दत्त देवस्थानचे माजी सचिव विनोद पुजारी यांनी व्यक्त केली. सीसीटीव्ही वरून भाविक दत्त दर्शन घेत होते.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments