राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी लांजातर्फे राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण आंदोलन
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी लांजातर्फे राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण आंदोलन
रत्नागिरी:- आज दिनांक 26 जून 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खड्डे व चिखलयुक्त राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 66 वरती वृक्षारोपण आंदोलन यशस्वीरित्या पार पडले दिनांक 18 जून 2021 रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लांजा च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना महामार्ग क्रमांक 66 वर खड्डे व चिखल झाल्याने सामान्य नागरिकांना यामध्ये प्रामुख्याने महिला वर्गाला जास्त त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांमुळे व चिखलामुळे दुचाकी घसरून मोठ्या प्रमाणात अपघात घडले सदर बाब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लांजा च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते सदर निवेदनाला अनुसरून दिनांक 25 6 2021 रोजी माननीय प्रांताधिकारी व माननीय तहसीलदार साहेब लांजा यांनी महामार्ग ठेकेदार यांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन सदर अडचणीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता परंतू हा प्रयत्न असफल ठरला सदर ठेकेदाराकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही सदर ठेकेदाराने सदर बाबींकडे दुर्लक्ष केले त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्यावतीने वृक्षारोपण आंदोलन आम्ही करणारच ही भूमिका सदर अधिकाऱ्यांच्या समोर ठामपणे मांडली व हे आंदोलन दिनांक 26 जून 2021 रोजी सकाळी ठीक दहा वाजून तीस मिनिटांनी लांजा शासकीय गोडाऊन समोर करण्यात आले सदर आंदोलनावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लांजा ठाम होते हे माहिती असून सुद्धा महामार्ग कार्यालयाचे कोणतेही अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचा ठेकेदार तसेच त्यांच्या प्रतिनिधी कोणी हजर राहू शकले नाही यावरून त्यांची बेपर्वाई दिसून येते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लांजा च्या वतीने दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन जर येता आठ दिवसात कामाला सुरुवात नाही केली गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येत्या ६ जुलै रोजी पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभारणार असून हे आंदोलन रास्ता रोको आंदोलन असणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लांजाच्या वतीने प्रशासनाला व ठेकेदाराला देण्यात आलेला आहे.सदर आंदोलनाला लांजा तालुक्यातील संभाजी ब्रिगेड, लांजा तालुका रिक्षा चालक मालक संघटना, शिवरायांचे मावळे, लांजा लाकूड व्यापारी संघटना, व्यापारी संघटना भाजी व फळ विक्रेते संघटना, मुस्लिम वेल्फेअर संघटना,व लांजा तालुका बौद्धजन मंडळ अशा अनेक संघटना तसेच काही व्यापारी वर्ग व सुजाण नागरिकांनी आपला पाठिंबा दिला होता.यावेळी जिल्हा सरचिटणीस अभिजित राजेशिर्के, तालुका खजिनदार संजय खानविलकर, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, युवक शहराध्यक्ष दिपक शेट्ये, लांजा तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष लहू कांबळे व पदाधिकारी, दाजी गडहिरे, अनिकेत शेट्ये, सोहेल घारे, शाहरूख नेवरेकर प्रणय साळवी, प्रविण हेगिष्टे, मंगेश बापेरकर, रमेश आग्रे, सुभाष दुड्ये, श्रीकांत साळवी संदिप शेट्ये व लांज्यातील नागरिक उपस्थित होते.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment