रत्नागिरी जिल्ह्यात ३ जून ते ९ जून या कालावधीत कडक लॉकडाऊन
रत्नागिरी जिल्ह्यात ३ जून ते ९ जून या कालावधीत कडक लॉकडाऊन
चिकन शॉप्स, मटण मार्केट, मच्छी मार्केट, किराणा, भाजी विक्री दुकाने सर्व राहणार बंद
बँका, वित्तीय संस्थांमध्ये केवळ कृषी विषयक सेवाच सुरु राहणार
जिल्हाधिकारी लक्ष्मिनारायण मिश्रा यांची माहीती
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात ३ जून ते ९ जून या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. या काळात किराणा, भाजीपाला विक्री, चिकन, मटण शॉप्स, मच्छी मार्केट, आदींसह सर्व आस्थापना बंद राहतील. जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के उद्योग व्यवसाय बंद राहतील. पावसाळ्यात शेतक-यांना पैशाची गरज असते. त्यामुळे बँका, वित्तीय संस्थांमध्ये केवळ कृषी विषयक सेवाच सुरु राहतील. उर्वरित सर्व सेवा बंद राहतील. जिल्हाधिकारी लक्ष्मिनारायण मिश्रा यांनी मंगळवार दिनांक १ जून रोजी झूम प्रणालीवरुन पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी या लॉकडाऊन कालावधीत जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. ३ जून ते ९ जून या कालावधीत सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार पूर्णत: बंद राहतील. पार्सल सेवा ही बंद राहिल. मेडिकल दुकानांमध्ये औषधांव्यतिरीक्त ग्रोसरी किंवा अन्य साहित्य विक्री होते. त्याला ही बंदी राहणार नाही. तसे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई केली जाईल. पेट्रोल पंपांमध्ये अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल, डिझेल मिळेल. पेट्रोल पंप सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहतील. कृषी विषयक दुकाने, खते, कीटकनाशके विक्री दुकाने सकाळी ७ ते २ या वेळेतच सुरु राहतील. अवजारांची दुकाने बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व खाजगी, शासकीय प्रवासी वाहतूक बंद राहिल. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना वाहतुकीची परवानगी दिली जाईल. सर्व आस्थापना बंद राहतील. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील. चिपळूण, खेड, रत्नागिरी रेल्वे स्थानकांवर कोरोना टेस्टिंग सुरु राहिल. मान्सून पूर्व सुरु असलेली सर्व शासकीय कामे सुरु राहतील. जसे की रस्त्यांचे डांबरीकरण. ज्या गावांमड्ये लग्न असतील. त्याठिकाणी १ पोलिस कॉन्स्टेबल, १ व्हीडीओ ग्राफर, तलाठी आदी असतील. तसेच लग्न समारंभातील लोकांची कोव्हिड टेस्ट केली जाईल. अशी माहीती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment