कविता म्हणजे:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
कविता म्हणजे
कविता माझा प्राण आहे
कविता माझी शान आहे......
मन प्रसन्न करी माझे
कविता रतनाची खाण आहे......
मनाला ती आनंद देई
कविता आनंदाचे गान आहे......
बघताक्षणी मोहून जाती सर्व
कवितेत सौंदर्य छान आहे......
कळत नकळत आपसात नाती जोडते
कवितेत माणुसकीची जाण आहे......
दुःखात, निराशेत मित्र होऊन धावून येते
कविता डोक्यातील घालवते ताण आहे......
अन्नाविना मानवास संतुष्ट करीते
कविता ईश्वरीय एक दान आहे......
सुख दुःखाचा बोध होता मन विरघळते
कवितेत सर्वचं भावनेचे भान आहे......
आपुलकी प्रेम यश सर्वकाही मिळते
कविता सर्वांना देते मान आहे......
समाज परिवर्तन लवकर घडविते
कविता जागृतीचे एक यान आहे......
सदासर्वदा मानवास खुश ठेवणारे
कविता एक हिरवेगार रान आहे......
ता.किनवट जि.नांदेड
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment